ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:42 IST2017-08-01T17:42:13+5:302017-08-01T17:42:13+5:30
ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
ही परिस्थिती सध्या ओगलेवाडी मार्गावर पहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला मद्यपानाचा कार्यक्रम संपल्यानंतर मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या शेतशिवारात तसेच रस्त्याकडेला टाकून देत आहेत.
मोकळ्या फुटलेल्या बाटल्या या रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला असलेल्या साईड पट्यांवर पडत असल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन वाहने पंक्चर होत आहेत. |