शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

By दीपक देशमुख | Updated: February 13, 2026 15:58 IST

विधानसभेवेळी थेट बोलले मग जिल्हा परिषदेला काय झालं ?

दीपक देशमुखसातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी महायुतीच्या बैठकांना भाजपचे मंत्री आले नसल्याचा ठपका शिंदेसेनेकडून ठेवला जात आहे. मात्र, विधानसभेवेळी पालकमंत्री थेट आमच्या मंत्र्यांशी बोलले. पण, जिल्हा परिषदेवेळी मात्र दुय्यम नेत्यांमार्फत बैठकांचे निरोप पाठवल्याचे भाजप कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही थेट बाेलावले असते तर अडचण नव्हती. व्हाया - व्हाया निरोप आल्याने घोटाळा झाल्याचे सांगत एकप्रकारे त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला दूर ठेवण्याची रणनिती आधीपासूनच असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपने शत-प्रतिशतची तयारी सुरू केल्याची चर्चा होती. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार)चे रामराजे नाईक - निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर गोपनीय भेट झाली. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही निवडणूक एकत्रित लढवण्याच्या अनुषंगाने खलबते सुरू होती. ही सर्व खलबते झाल्यानंतर महायुतीसाठी बैठकांसाठी बोलावणे आल्याचे भाजप कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. त्यातही बैठकांचा प्रोटोकॉल असतो. माध्यमांवरील चर्चा किंवा दुय्यम नेत्यांकडून आलेल्या निरोपांवर मंत्री बैठकांना जात नाहीत, असे काही कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.

वाचा: जिल्हा परिषदेसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटत्यामुळे भाजपला बाजूला ठेवण्याची रणनिती आखून शिंदेसेना - राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे रणमैदान जिंकले आहे. आता सत्तावाटपात भाजपला महायुतीचे हे दोन्ही मित्रपक्ष सहभागी करून घेणार काय? याची उत्सुकता लागली आहे.पालकमंत्र्यांचे भाजप नेत्यांकडे बोटशिंदेसेनेकडून महायुतीसाठी बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्या बैठकांना भाजपचे कोणतेच मंत्री जिल्ह्यात असूनही आले नाहीत, असा आरोप करत तिसऱ्यांदा तोंडावर पडायचे नसल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. तथापि, राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला व आम्ही एकत्रित निवडणूक लढवली असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

शिवेंद्रसिंहराजेंकडून इन्कारमहायुतीसाठीच्या बैठकीला बोलावणे आल्याचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांसमोर इन्कार केला आहे. आम्हाला थेट निरोप आला नाही. व्हाया - व्हाया (कोणाच्या तरी माध्यमातून) असे निरोप आल्यानेच हा घोटाळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप संख्येने जरी मोठा पक्ष असला तरी देसाई हे मोठे नेते आहेत. त्यांच्या हातात हात द्यायलाच काय आम्ही तर अलिंगन द्यायला तयार असल्याचे सांगितले.वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठाजिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीशिवाय अशक्य आहे. शिवाय राज्यात चौखूर उधळलेला भाजपचा वारू साताऱ्यात रोखला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषदेत भाजपला सहभागी करून घेणार काय, भाजपच्या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळणार काय, याची उत्कंठा लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Zilla Parishad power struggle: Alliance discord due to indirect communication.

Web Summary : Satara Zilla Parishad's power grab sees alliance tensions. BJP alleges indirect communication led to exclusion. Senior leaders' decision awaited.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरMahayutiमहायुतीShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपाShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना