अतिरिक्त पाणी माण-खटावकडे सोडावे :पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:06 PM2020-08-08T19:06:11+5:302020-08-08T19:08:22+5:30

उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली.

Excess water should be released to Maan-Khatav: Guardian Minister | अतिरिक्त पाणी माण-खटावकडे सोडावे :पालकमंत्री

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह व इतर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देअतिरिक्त पाणी माण-खटावकडे सोडावे :पालकमंत्रीसातारा-सांगली सिंचन विभागाने समन्वय ठेवून कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना

सातारा : उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली.

कालवा सल्लागार समितीची बैठक सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मिसाळ, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अरुण लाड यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले,सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन विभागांनी आपापसात समन्वय ठेवून प्रकल्पीय तरतुदीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील कालव्यांना योग्य वेळी पाणी सोडावे, कोणत्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे, यापुढे असाच पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, सातारा, सांगली जिल्ह्यातील कुठल्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आवर्तनाचे नियोजन करावे. प्रकल्पीय तरतुदीनुसार कोट्यानुसार प्रत्येक भागाला पाणी दिले जावे, असेही पालकमंत्री पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले.

सांगलीसाठी १ सप्टेंबरपासून आवर्तन

१ सप्टेंबरपासून ठरवून दिल्याप्रमाणे सांगलीसाठी आवर्तन सुरु करावे. तसेच सातारा तालुक्यातील रखडलेल्या सिंचनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

 

Web Title: Excess water should be released to Maan-Khatav: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.