माजी नगराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: March 14, 2015 00:01 IST2015-03-13T22:00:52+5:302015-03-14T00:01:19+5:30

उंब्रज मारामारी प्रकरण : उर्वरित फरार संशयितांचा शोध सुरूच

Ex-municipal police custody | माजी नगराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

माजी नगराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

कऱ्हाड : उंब्रज, ता. कऱ्हाड येथील मारामारीप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी कऱ्हाड शहर पोलिसांनी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांना ताब्यात घेतले. त्यांना उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते.उंब्रज येथे मागील आठवड्यात जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो अडविण्यात आला होता. यावरून उंब्रज पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये दोन गटांत वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वातावरण निवळले.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील तीसहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींचा मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांचाही समावेश आहे.शुक्रवारी कऱ्हाड शहर पोलिसांनी अल्ताफ शिकलगार यांना ताब्यात घेतले. याबाबतची नोंद शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ex-municipal police custody