शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी करणे प्रत्येकाची जबाबदारी : गुदगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

मायणी : ‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ, सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक ...

मायणी : ‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ, सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या उपक्रमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची जबाबदारी असून पारंपरिक ऊर्जा व रेनवॉटर हार्वेस्टिंग इमारतींच्या करात सवलत देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन सरपंच सचिन गुदगे यांनी केले.

मायणी येथे ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना, अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस यांसह विविध शासकीय व निमशासकीय क्षेत्रांत कार्य करीत असलेले कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेल्या इंदिरानगर भागात असलेल्या गटारीच्या बंदिस्तीकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकसंख्येच्या वर असलेल्या सहा गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील मायणी हे एकमेव गाव आहे. या गावामध्ये शासनामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग हा महत्त्वपूर्ण घटक आहे.

चौकट :

प्लास्टिकविरोधी कारवाई करणार

ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या इमारतीमध्ये पारंपरिक ऊर्जा व सौरऊर्जेचा वापर तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या ग्रामस्थांना करांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.