शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील निम्मे कारखाने अद्याप बंद; गळीत हंगाम रडतखडतच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:11 IST

बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.

नितीन काळेलसातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी सातारा जिल्ह्यात मात्र, रडतखडतच प्रवास आहे. अजूनही निम्मे कारखाने बंद आहेत, तर काही कारखान्यांनी आणखी गाळप परवानाच घेतलेला नाही. त्यातच शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाची धार वाढू शकते. त्यामुळे गाळप हंगाम कधी पूर्ण क्षमतेने सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. पूर्वी पश्चिम भागात ऊसक्षेत्र अधिक होते. पण, मागील काही वर्षांत माण, खटाव तालुक्यातही पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यातच साखर कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १६ कारखाने आहेत. गेल्यावर्षी मे-जूनपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा आतापर्यंत ७ ते ८ कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे.पुणे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत -अथनी सहकारी साखर कारखाना, स्वराज इंडिया ॲग्रो, श्री दत्त इंडिया, शरयू ॲग्रो, श्रीराम जवाहर, जयवंत शुगर्स, ग्रीन पॉवर शुगर्स, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी, खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग, जरंडेश्वर या कारखान्यांनी गाळप परवाना घेतला आहे. तर किसन वीर, अजिंक्यतारा, सह्याद्री, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांनी अद्याप परवाना घेतलेला नाही. जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखान्याचा हंगाम बंद आहे. अशा स्थितीत सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. त्यातच शेतकरी संघटना दर आणि थकबाकीसाठी आक्रमक झाल्या आहेत. यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने कधी गाळप करणार, हा प्रश्न आहे.जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने यावर्षी तुकडे-तुकडे न करता एकरकमी एफआरपी द्यावी, मागील थकबाकी आणि नफ्यातील २०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यातच बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.

रयत- अथनी कारखान्यानेच दर जाहीर केला आहे. असे असले तरी अनेक कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आंदोलन करण्यावर ठाम आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात मोर्चा काढला होता. साखर आयुक्तांसमोर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची धार वाढवू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांनी मागील थकबाकी आणि यावर्षीचा दर जाहीर न केल्यास आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील साखर कारखाने मागचे पैसे आणि नवीन दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कोणीही तोड करू नये. तसेच उसाची वाहतूक आणि कारखानेही सुरू करू नयेत. जे कारखाने सुरू आहेत, त्याबाबत साखर आयुक्तांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत. आता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. कारखानदारांना गुडघे टेकायला लावून दर घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आंदोलनाची धार आणखी वाढवणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने