शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:39+5:302021-09-07T04:46:39+5:30

सातारा : शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. ...

Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered! | शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

सातारा : शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. अशा नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते.

मीटरमध्ये झोल करणे, खांबावर आकडा टाकून वीज चोरी करणे, असे प्रकार अनेकदा उघडकीस येत असतात. महावितरणचे कर्मचारी दक्ष राहून ही वीजचोरी अनेकदा पकडतात. यामध्ये काही लोक शेजाऱ्याकडून वीज घेतात. मीटर वेगवेगळे ठेवले नसल्यामुळे एकत्रित बिल दिले जाते, हेसुद्धा कायद्याने चुकीचे आहे. जर असा प्रकार कुठे घडत असल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. जे बिल आहे, त्याच्या दुप्पट बिल आकारून दंडात्मक वसुली होते.

१) महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

प्रकरणे युनिट चोरी दंड वसुली

शहर २३९ २,०५,५६७. १२,४५,५०६

ग्रामीण २५३ २,३४,५०६ २४,८०,४९४

एकूण ४९२. ४,४०,०७३. ३७,२६०००

२) कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३मधील कलम १२६नुसार विजेचा वापर करणे हा गुन्हा आहे. वीजचोरी उघडकीला आल्यास गुन्हा करणाऱ्यांना कठोर दंड होतो तसेच तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

३) चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा (बॉक्स)

आपल्या घराजवळ अथवा गावात, गल्लीत कोणी चोरुन विजेचा वापर करत असेल तर त्याबाबत वीज विभागाला कळवावे. वीजचोरीची माहिती दिली तर १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला मिळू शकते.

४) महावितरण अभियंत्याचा कोट

वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. महावितरणतर्फे याबाबत वारंवार जागृती केली जाते. दंडात्मक कारवायाही होतात. जे लोक वारंवार वीजचोरी करतात, त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला जातो.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.