वडगाव हवेलीत दिव्यांग मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:45+5:302021-09-13T04:37:45+5:30
या वेळी दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यासाठी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, सरपंच शोभाताई मस्के, उपसरपंच सर्जेराव मदने, सदस्य ...

वडगाव हवेलीत दिव्यांग मेळावा उत्साहात
या वेळी दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यासाठी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, सरपंच शोभाताई मस्के, उपसरपंच सर्जेराव मदने, सदस्य पोपट मदने, सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के, सुनील शिंगाडे, नाना जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. एन. कोळी, आरोग्य विभागाचे कर्मचारी सीताराम गायकवाड, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन पवार, पोलीस पाटील सचिन साळुंखे, संतोष सातपुते, वंदना एटम, राणी कांबळे, दीपा बनसोडे शशिकांत जाधव उपस्थित होते.
या वेळी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे यांनी दिव्यांग लोकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली, तसेच संघटनेच्या पाटण तालुकाध्यक्षा विद्या कारंडे यांनी निराधार, विधवा, परितक्त्या महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार संघटना कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. संघटनेचे कऱ्हाड तालुका सचिव शामराव मदने यांनीही या अनोख्या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या कार्यकर्त्या नीलम कारंडे यांनीही आपले मत व्यक्त केले.
दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यात बहुसंख्येने दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष सातपुते यांनी केले. स्वागत सुनील शिंगाडे व अशोक मस्के यांनी केले. संयोजन ज्ञानदेव वायदंडे यांनी केले. सचिन साळुंखे यांनी आभार मानले.