गाडगे महाराज महाविद्यालयात इंग्रजी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:40+5:302021-03-28T04:36:40+5:30
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. ए. टी. जाधव, इतिहास विभागप्रमुख प्रा. एन. ...

गाडगे महाराज महाविद्यालयात इंग्रजी कार्यशाळा
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. ए. टी. जाधव, इतिहास विभागप्रमुख प्रा. एन. आर. सूर्यवंशी, उपप्राचार्या डॉ. माधुरी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. ए. टी. जाधव यांनी इंग्रजी भाषा कौशल्ये अधोरेखित करीत श्रवण, भाषण, लेखन व वाचन ही भाषा कौशल्याची चतुसूत्री असल्याचे सांगितले. ही भाषा कौशल्ये जर प्राप्त केली तर तुम्ही तुमच्या विचारांना योग्य व सुंदर तऱ्हेने व्यक्त करू शकता, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. एन. आर. सूर्यवंशी यांनी भाषा निर्मितीबद्दल आपले विचार व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ. संभाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. गिरीश कल्याणशेट्टी, प्रा. सुहास गोडसे, प्रा. सुनील जाधव, विद्या पाटील यांनी या कार्यशाळेत सहभाग दर्शविला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अश्विनी तातुगडे यांनी केले. प्रा. डॉ. एस. बी. माने यांनी आभार मानले.