शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

वाठार स्टेशन येथे पुणे-कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:17 IST

आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन हद्दीत कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे ...

आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन हद्दीत कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन घसरले. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली. मात्र, सुमारे ५ तास लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.याबाबत माहिती अशी की, पुणे-मिरज लोहमार्गावर ५१४०९ पुणे-कोल्हापूर पॅसेंजर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होती. रेल्वे बारा वाजण्याच्या सुमारास आदर्कीहून रवाना झाली. वाठार स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे चालकाला रुळावर काहीतरी वस्तू असल्यासारखी दिसली. ती लोखंडी असावी असा संशय आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. तरीही नियंत्रण सुटून रेल्वे इंजिनची (डब्ल्यू डीपी ४ डी) पुढील चाके रुळावरून घसरली. इंजिन रुळ सोडून तशीच पुढे जात राहिल्याने लोहमार्गावर शंभर ते दोनशे मीटर अंतरातील सिमेंट शिल्पर, लोखंडी लाईनर, जाँईट पट्टी, बोल्ट तुटले. तसेच रेल्वे इंजिनची संरक्षक जाळी तुटली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पॅसेंजरमध्ये सुमारे दीड हजार प्रवासी होते.अपघाताची माहिती समजताच वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सहायक फौजदार व्ही. के. धुमाळ, राहुल कांबळे व कर्मचारी तातडीने हजर झाले. सातारा, वाठार, नीरा येथून रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी व कर्मचाºयांच्या पाच तासांच्या प्रयत्नानंतर लोहमार्गावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी या मार्गावरून पहिली रेल्वे रवाना झाली. या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांचा मात्र खोळंबा होऊन मोठे हाल झाले.इतर रेल्वे गाड्यांना उशीरया अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस लोणंद रेल्वे स्थानकावर थांबवून तिचे इंजिन काढून अपघातस्थळी आणले. त्याच्या मदतीने पॅसेंजर आदर्की स्थानकावर आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, पुण्याच्या दिशेने जाणारी अजमेर एक्स्प्रेस सातारा स्थानकावर थांबवण्यात आली.