वृध्द महिलेला बोलण्यात गुंतवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:36+5:302021-06-17T04:26:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जुन्या मोटार स्टँड परिसरात वृद्ध महिलेला दोन अनोळखी व्यक्तींनी ‘तुम्हाला धान्य पाहिजे का?’ ...

वृध्द महिलेला बोलण्यात गुंतवून
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जुन्या मोटार स्टँड परिसरात वृद्ध महिलेला दोन अनोळखी व्यक्तींनी ‘तुम्हाला धान्य पाहिजे का?’ असे विचारले. त्यानंतर वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ बटव्यात ठेवण्यास सांगून बोलण्यात गुंतवून ५९ हजार रुपयांची सोन्याची माळ लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार गिरीजाबाई लालचंद तपासे (वय ८०, रा. गुरुवार पेठ, सातारा) या दि. १५ रोजी जुन्या मोटार स्टँडवरील दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या हॉटेलच्या पायरीवर बसल्या होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या दोन अनोळखींनी त्यांना धान्य पाहिजे का? असे विचारत संवाद वाढवला. त्या दोघांनी त्यांना गळ्यातील सोन्याची माळ काढून त्यांच्या कमरेच्या बटव्यात ठेवण्यास सांगितले. यावेळी बोलण्यात गुंतवून त्यांनी बटव्यातील सोन्याची माळ घेऊन तेथून पोबारा केला. ही बाब लक्षात आल्यावर गिरीजाबाई तपासे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार काशीद करत आहेत.