कृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 01:18 PM2021-07-01T13:18:04+5:302021-07-01T13:23:14+5:30

कऱ्हाड : येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेरीस सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर आहे. सत्ताधारी ...

At the end of the first round, the ruling Dr. Suresh Bhosale's cooperation panel at the forefront | कृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर

कृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देकृष्णा कारखाना निवडणुक : सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवरविरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत

कऱ्हाड : येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेरीस सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल आघाडीवर आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होत असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल.

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत गुरुवारी प्रारंभ झाला. मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्‍यात होत आहे.

सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल ९१ टक्के मतदान होऊन ३४ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी सकाळी ८ वाजता ७४ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

यासाठी सुमारे ३०० कर्मचारी काम करत आहे. प्रत्येक टेबलवर दोन मतदान केंद्राची मोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ५,५४६ एवढ्या मोठ्या मताधिक्याने सहकार पॅनेलचे विलास भंडारे यांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी विजयाकडे वाटचाल करीत आहे.

अनुसूचित जाती जमाती

  • विलास भंडारे : (सत्ताधारी सहकार पॅनल) १०,१६९  
  • शिवाजी आवळे : (संस्थापक पॅनल) ४,६२३ 
  • अधिक भंडारे :  (रयत पॅनल) २,१७६ 
  • सहकार पॅनलचे विलास भंडारे ५,५४६ मतांनी आघाडीवर
     

इतर मागास प्रवर्ग पहिली फेरी

  • वसंतराव शिंदे (सहकार पॅनल) १०१२५ 
  • मिलिंद पाटणकर (संस्थापक पॅनल) ४६३३
  • शंकरराव रणदिवे (रयत पॅनल) २१९८
  • सहकार पॅनलचे वसंतराव शिंदे ५,४९२ मतांनी आघाडीवर


विमुक्त जाती व भटक्या जमाती

  • अविनाश खरात (सहकार पॅनल १०१८०)
  • नितीन खरात (संस्थापक पॅनल ४,५६८)
  • आनंदराव मलगुंडे (रयत २१३०)
  • शंकर कारंडे (३७)
  • सहकार पॅनेलचे अविनाश खरात ५,६१२ मतांनी आघाडीवर

Web Title: At the end of the first round, the ruling Dr. Suresh Bhosale's cooperation panel at the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.