शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कऱ्हाडच्या मंडईतील अतिक्रमण हटवले, पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 7:38 PM

Muncipal Corporation, Satara area, karad कऱ्हाड येथील पालिकेच्यावतीने मंडई परिसरात मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर थाटण्यात आलेले गाडे, पानटपऱ्या, दुकानांचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांनाही समज देण्यात आली.

ठळक मुद्दे कऱ्हाडच्या मंडईतील अतिक्रमण हटवले, पालिकेची कारवाई हातगाड्यांसह खोकी जप्त; विक्रेत्यांसह संघटना आक्रमक

कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने मंडई परिसरात मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर थाटण्यात आलेले गाडे, पानटपऱ्या, दुकानांचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांनाही समज देण्यात आली.दरम्यान, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठे विक्रेते रस्त्यानजीक व्यवसाय करीत असून, त्यांना या कालावधित व्यवसाय करू द्यावा. त्यांचे व्यवसाय हटवू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध संघटनांही आक्रमक झाल्या. अखेर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कक्षात याबाबत सकारात्मक चर्चा होऊन दीपावलीनंतर ही मोहीम पुन्हा सुरू करण्याचे ठरविण्यात आले.शहरातील प्रभात टॉकीज, महात्मा फुले पुतळ्यापासून जनता व्यासपीठापर्यंत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीला अडथळा ठरणारी खोकी, हातगाडे व अन्य साहित्य हटविण्यात आले. तर जनता व्यासपीठासमोर पार्क केलेली अनेक वाहने काढण्यात आली. मुख्याधिकारी रमाकांत डाके व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मोहिम सुरू केली. महात्मा फुले पुतळ्यापासून मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे काही गाडे पालिकेने ताब्यात घेतले. तर या परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली. पालिकेच्या कम्पाऊंडसमोरील भाजी विक्रेत्यांनाही हटविण्यात आले.जनता व्यासपीठासमोरील मैदानात अनेक दिवसांपासून पार्क केलेली वाहने हटवण्यात आली. मैदानात असणारी खोकी, चायनीजचे गाडे काढण्यात येऊन इतरत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा मोकळी करून देण्यात आली. यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विक्रेत्यांनी बराच वेळ वाद घातल्याने मोठी गर्दी झाली होती. सध्या दिवाळीमुळे अनेक छोट्या विक्रेत्यांनी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. त्यामुळे त्यांना पालिकेने हटवू नये, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी डाके यांच्यासमोर केली.रस्त्यावर भाजी विकल्यास कारवाईविविध संघटनेचे पदाधिकारी व विक्रेत्यांसोबत बराच वेळ चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कक्षात याबाबत बैठक झाली. या बैठकीत रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मुख्य मंडईत जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. सबंधित विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसल्यास पालिका कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरKaradकराड