शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

महावितरणच्या अधिकार्‍याना कर्मचार्‍यानीच कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:35 PM

कºहाड : खांबावर विद्युत धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या घटनेला जबाबदार धरून दोन कर्मचाºयांना निलंबित केल्याप्रकरणी कºहाडमध्ये तणाव निर्माण झाला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कर्मचाºयांनी महावितरणच्या अधिकाºयांना कार्यालयात डांबून ठेवले. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतरही तोडगा काढण्यात यश मिळाले नाही.धोंडिराम गायकवाड या वायरमनचा सोमवारी निगडी येथे खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा ...

कºहाड : खांबावर विद्युत धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या घटनेला जबाबदार धरून दोन कर्मचाºयांना निलंबित केल्याप्रकरणी कºहाडमध्ये तणाव निर्माण झाला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कर्मचाºयांनी महावितरणच्या अधिकाºयांना कार्यालयात डांबून ठेवले. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतरही तोडगा काढण्यात यश मिळाले नाही.धोंडिराम गायकवाड या वायरमनचा सोमवारी निगडी येथे खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला होता. काम सुरू असतानाही वीजपुरवठा सुरू केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले. हे समजताच संतप्त झालेल्या सुमारे १०० वायरमन मंडळींनी मंगळवारी ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, दिवसभर अधिकाºयांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.दरम्यान, सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अधिकारी घरी जात असताना चिडलेल्या कर्मचाºयांनी त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. या अधिकाºयांसह कारकून मंडळींना कार्यालयातच कोंडले. कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून वायरमन मंडळी बराचवेळ आपल्या मागणीवर ठाम राहिली.रात्री उशिरापर्यंत हे अधिकारी आतच अडकल्याचे समजताच पोलिसांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ओगलेवाडी परिसरात तणाव निर्माण झाला होता.विजेचा अधिकार अधिकाºयांनाच...विद्युत खांबावर दुरुस्ती सुरू असताना विद्युतपुरवठा बंद ठेवणे अथवा सुरू करणे याचा निर्णय केवळ महावितरणचे अधिकारीच घेऊ शकतात. त्यांनी आदेश दिल्यानंतरच कर्मचारी विद्युतपुरवठा सुरू करतात. त्यामुळे निगडी दुर्घटनेला अधिकारी जबाबदार असताना कर्मचाºयांना निलंबित करण्याचा निर्णय चुकीचा आहे. तेव्हा संबंधितांवरची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या वायरमन मंडळींची आहे.