शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: वाढे सोसायटीत ६० लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड; सचिवास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:08 IST

सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करून सुमारे ६० लाख रुपयांचा अपहार

सातारा : सातारा तालुक्यातील वाढे सोसायटीत सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करून सुमारे ६० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्याविरोधात गुन्हा नोंद असून सचिवाला अटक केली आहे. हा प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी प्रमाणित लेखापरीक्षक दत्तात्रय जयसिंगराव पवार (रा. पारगाव खंडाळा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर सचिव राजेंद्र भानुदास चव्हाण (रा. फडतरवाडी, ता. सातारा) याच्यासह अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.एप्रिल २०१६ पासून ३१ मार्च २०२० या कालावधीत वाढे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. स्वत:च्या लाभासाठी पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक खोट्या नोंदी केल्या, त्याचबरोबर रोख शिल्लक चुकीची दर्शवून कर्जदाराचा जमा बँकेत ठेवला नाही. स्वत:च्या लाभात ठेवून संस्था आणि सभासदांची ५९ लाख ९१ हजार ९७० रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान, सोसायटीतील हा अपहार लेखापरीक्षणात समोर आला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी