शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात टेस्लासह मोठ्या कंपन्यांची जागेची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST

राजकीय इच्छाशक्तीची गरज : जिल्ह्याला हवेत रोजगार निर्माण करणारे प्रकल्प

सातारा : इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी साताऱ्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुटे भाग जोडणारे (सीकेडी) असेम्ब्ली युनिट उभारण्यासाठी जमिनीचा शोध घेत असून, मोठे भूखंड निश्चित करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. टेस्लासह साताऱ्यात अनेक कंपन्या येण्यास इच्छुक असून, त्याही जागेची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास अशा उद्योगांना जागा मिळून उद्योग येऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळेल.टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाची जबाबदारी गेल्या आठवड्यात सोपविण्यात आली आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंगसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर साताऱ्यात युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर जी चर्चा सुरू आहे, त्यात ऑटोमोबाईल्सवरील शुल्क सवलतीचाही समावेश आहे. भारत ०-१ टक्के दराने गाड्यांचे पार्ट्स आयात कर भरण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. त्यामुळे अमेरिका तिच्या २५ टक्के शुल्कात सवलत देईल. या पार्श्वभूमीवर भारत एसएमईसी धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सध्या भारतातील एका दुसऱ्या नामांकित भागीदार कंपनीसोबत संयुक्त उद्योग स्थापनेच्या तयारीत आहे.टेस्लाकडून इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यात येणार आहे. यामध्ये गाड्यांचे सुटे भाग आणून ते भारतातील कारखान्यात जोडले जातील. त्यामुळे आयात शुल्क कमी होते व स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. टेस्ला भारतात जानेवारीत येणे अपेक्षित असून, मुंबईत एक शोरूमसुद्धा निश्चित केले आहे. तेथून आयात गाड्यांची विक्री सुरू केली जाणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणामसाताऱ्यात टेस्लाने युनिट सुरू केल्यास स्थानिक तरुणांसाठी कुशल व अकुशल नोकऱ्यांच्या संधी वाढतील. लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कॅटरिंग आदींमध्ये रोजगार वाढेल. जागतिक दर्जाची कंपनी आल्यामुळे सातारा औद्योगिक नकाशावर येईल. इतर ऑटोमोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्याही गुंतवणुकीसाठी साताऱ्याकडे आकर्षित होतील. औद्योगिक विकासामुळे रस्ते, वीज, पाणी आणि इतर औद्योगिक सुविधा उभारल्या जातील. औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांसाठी आयटीआय, पॉलिटेक्निक व इतर प्रशिक्षण केंद्रे सुरू होऊ शकतात. सीएसआर अंतर्गत स्थानिक शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही मदत मिळू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeslaटेस्ला