Satara: जीव धोक्यात घालून वीज वितरण कर्मचारी पाडतायत ‘उजेड’
By प्रगती पाटील | Updated: December 29, 2023 13:49 IST2023-12-29T13:47:32+5:302023-12-29T13:49:07+5:30
सातारा : गुरूवार बाग परिसरात एका वाहनाच्या धडकेत वाकलेल्या खांबामुळे परिसरातील वीज गायब झाली. वीज वितरण कंपनीला पाचारण केल्यानंतर ...

Satara: जीव धोक्यात घालून वीज वितरण कर्मचारी पाडतायत ‘उजेड’
सातारा : गुरूवार बाग परिसरात एका वाहनाच्या धडकेत वाकलेल्या खांबामुळे परिसरातील वीज गायब झाली. वीज वितरण कंपनीला पाचारण केल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे दुरूस्तीचे आणि वायरचा गुंता सोडविण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शीडीही नव्हती. बंद अवस्थेत असलेल्या एका गाडीवर चढून त्यांनी हे काम पूर्ण केले.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरूवार बाग ते अदालत वाडा मार्गावर रस्त्याकडेला असलेल्या एका खांबाला वाहनाची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की विद्युत खांब अक्षरश: वाकला. त्यामुळे वायर एकमेकांत गुंतल्याने परिसरातील काही घरांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला. या कामासाठी आलेल्यांकडे सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री नसल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. याबाबत त्यांनी संबंधितांना सुचनाही केल्या पण अत्यंत सराइतपणे त्यांनी हे काम पूर्ण करून परिसरातील विद्युत पुरवठा पुर्ववत केला.