रस्त्याकडेला नव्हे तर किचनमध्ये विद्युत खांब : साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:30 AM2019-05-10T00:30:06+5:302019-05-10T00:30:47+5:30

दत्ता यादव । सातारा : आत्तापर्यंत आपण विद्युत खांब रस्त्याच्याकडेला पाहत आलो आहोत. मात्र, साताºयात उलट चित्र अनेकांना पाहायला ...

Electric pole in the kitchen, not on the road, but the shocking types of Satara | रस्त्याकडेला नव्हे तर किचनमध्ये विद्युत खांब : साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

साताऱ्यातील रशिद शेख याच्या स्वयंपाक घरातच पदपथावरील विद्युत खांब रोवला आहे.

Next
ठळक मुद्देघरमालक अन् वीजवितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये पत्रव्यवहारातून खडाजंगी

दत्ता यादव ।
सातारा : आत्तापर्यंत आपण विद्युत खांब रस्त्याच्याकडेला पाहत आलो आहोत. मात्र, साताºयात उलट चित्र अनेकांना पाहायला मिळत आहे. सार्वजनिक विद्युत खांब एका व्यक्तीच्या चक्क किचनमध्ये असून, हा खांब हटविण्यासाठी घरमालक आणि वीजवितरणच्या अधिकाºयांमध्ये नुसतीच पत्रव्यवहारातून खडाजंगी सुरू आहे. असे असताना हजारो होल्टच्या विळख्यात संबंधित कुटुंबीय रोजच मरणयातना भोगत आहे.

जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील बाजूस असणाºया राजसपुरा पेठेमध्ये रशिद शेख आपल्या कुटुंबासमवेत राहतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा भावांभावांमध्ये वाटपाचा दावा न्यायालयात सुरू होता. तिन्ही भावांमध्ये जागा वाटप होण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर मोकळी जागा होती. या जागेत पूर्वीपासून वीजवितरणचा खांब आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तिन्ही भावांना घराची जागा वाटण्यात येणार होती. परंतु वीज वितरणचा खांब त्यांना अडथळा ठरत होता. त्यामुळे शेख यांनी निकाल लागण्यापूर्वीच आमच्या जागेतून खांब हटविण्यात यावा, अशी मागणी वीज वितरणच्या अधिकाºयांकडे केली. मात्र, त्यांना अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांतच शेख यांचा वाटपाच्या दाव्याचा निकाल लागला.

त्यावेळी तिन्ही भावंडांनी घर बांधण्यासाठी आपापसात जागा वाटून घेतली. घराच्या मधोमध खांब असलेली जागा रशिद शेख यांच्या वाटणीवर आली. हा खांब हटविण्यासाठी शेख यांनी बºयाचवेळा वीजवितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. भर पावसात राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा राहिल्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी सार्वजनिक खांब चारीबाजूंनी पत्रा लावून चक्क किचनमध्ये घेतला. एक वर्षे झाले शेख कुटुंबीय हजारो होल्टच्या विळख्यात संसार हाकत आहेत. रात्री-अपरात्री शॉर्टसर्किट होऊन खांबामधून वीज घरात पसरली तर या विचारानेच शेख कुटुंबीय भयभीत होत आहे. महिनाभरात पावसाळा सुरू होणार असल्याने शेख कुटुंबीय आणखीनच चिंतेत पडले आहे.


लोकशाही दिनातही धाव..
रशिद शेख हे रिक्षा चालवितात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. घरातील खांब हटविण्यासाठी त्यांनी लोकशाही दिनातही अर्ज दाखल केला होता. घरात असलेल्या खांबाला धडकून पत्नी पडल्याने खुबा फॅ्रक्चर झाला. यासंदर्भातली सर्व कागदपत्रे त्यांनी अर्जासमवेत जोडली. त्यावेळी अधिकाºयांकडून हालचाली सुरू झाल्या. वीजवितरणच्या अधिकाºयांनी त्यांना उलट पत्र पाठवल्याने आणखीनच चिंतेत पडलेय.


म्हणे अपघाताची दाट शक्यता..
लघुदाब वाहिनीच्या खांबाखाली धोकादायकरीत्या पत्राशेड वाढविले आहे. खांब संपूर्ण पत्र्याने वेढलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात विद्युत अपघात घडण्याची दाट श्क्यता आहे. हे पत्र मिळाल्यानंतर त्वरित विद्युत खांबाजवळील लोखंडी पत्र्याचे शेड काढून घेण्यात यावे, अन्यथा भविष्यात या ठिकाणी होणाºया विद्युत अपघातास होणाºया नुकसानीस तुम्ही स्वत: जबाबदार राहाल, असे लेखी पत्र पोवई नाका येथील सहायक अभिंत्यांनी रशिद शेख यांना पाठविले आहे.


 

Web Title: Electric pole in the kitchen, not on the road, but the shocking types of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.