शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपालिका तर सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य निवडणूक आयोगाने वाॅर्ड रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश नगरपालिका व नगर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने वाॅर्ड रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश नगरपालिका व नगर पंचायतींना दिले आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपल्या वाॅर्डात आपली उमेदवारी कशी सक्षम राहील, या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातील इच्छुक आतापासूनच तयारीला लागले आहेत.

सातारा जिल्ह्यातील मलकापूर वगळता उर्वरित आठ नगरपालिकांची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची २०१६ रोजी झालेली पंचवार्षिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. तेव्हा एका प्रभागातून दोन सदस्य निवडून आले होते. आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. सातारा पालिकेची नुकतीच हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढीमुळे यंदा ४८ वाॅर्ड निश्चित होणार असून नगरसेवक संख्याही ४० हूून ४८ इतकी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार हद्दवाढ लागू झालेल्या नगरपालिकांनी भौगोलिक बदल आणि क्षेत्र निश्चिती करून त्याचे नकाशे तयार करावयाचे आहेत. कच्चा आराखडा पूर्ण होताच त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे.

दरम्यान, साताऱ्यासह जिल्ह्यातील आठही पालिका व नगर पंचायतींमध्ये गेल्या पावणे पाच वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवाय राजकीय समिकरणेही बदलली आहेत. याचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला लॉटरी लागणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(चौकट)

आराखड्याबाबत आज बैठक

वाॅर्ड रचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत मंगळवार, दि. २४ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचा ऑनलाइन सहभाग असणार आहे. बैठकीत प्रारूप आराखड्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून, निवडणूक आयोगाकडून नवे काय निर्णय घेतले जातायत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(चौकट)

निवडणुकीचे असे आहेत टप्पे

- कच्चा प्रारूप आराखडा

- लोकसंख्येचा नकाशा आणि हद्द निश्चिती

- हद्दनिश्चितीवर हरकती व सुनावणी

- अंतिम मतदार यादी

- सदस्य निश्चिती

- वाॅर्ड व नगराध्यक्ष आरक्षण

- आचारसंहिता

- मतदान, मतमोजणी, निकाल

(चौकट)

या पालिका, नगर पंचायतींची निवडणूक

पालिका : सातारा, कऱ्हाड, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड

नगर पंचायत : खंडाळा, दहिवडी, पाटण, वडूज, कोरेगाव, लोणंद