पालखी सोहळ्यावर आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:26 PM2019-06-30T23:26:45+5:302019-06-30T23:26:49+5:30

लोणंद : पालखी आगमन, मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळ्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार व समाजकंटकांवर आठ ड्रोन कॅमेरेने नजर ठेवता ...

Eight Drone Cameras Look at Palkhi Festival | पालखी सोहळ्यावर आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

पालखी सोहळ्यावर आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

googlenewsNext

लोणंद : पालखी आगमन, मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळ्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार व समाजकंटकांवर आठ ड्रोन कॅमेरेने नजर ठेवता येणार आहे. तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावले आहेत.
पालखी सोहळ्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एक अप्पर पोलीस अधीक्षक, ५ डीवायपासपी, १० पोलीस निरीक्षक, ५५ सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ६८० पोलीस जवान, १०० पोलीस हवालदार, ११४ वाहतूक पोलीस कर्मचारी असे एकूण ९६२ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड असे एकूण ७०० होमगार्ड, ०१ एसआरपीएफ कंपनी पाळखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे. तसेच खासगी वेशात ५ अधिकारी व ५० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. ही पथके चोºया, चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी मदत करणार आहेत. पालखी तळावर वॉच टॉवर लावण्यात येणार असून, रात्रंदिवस एसआरपीएफ, आरसीपी व क्यूआरटीची पथके नेमण्यात आली आहेत.

Web Title: Eight Drone Cameras Look at Palkhi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.