शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने आणखी ११० बेडची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:41 IST

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना ही महाभयानक महामारी आहे. अशी महामारी १०० वर्षांपूर्वी आली होती. ज्याला आपण स्पॅनिश ...

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना ही महाभयानक महामारी आहे. अशी महामारी १०० वर्षांपूर्वी आली होती. ज्याला आपण स्पॅनिश फ्लू नावाने ओळखतो. त्यावेळी हजारो माणसे मृत्युमुखी पडली होती. परंतु त्याचीच दुसरी लाट आली, त्यावेळी त्याचा परिणाम पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. याचप्रमाणे १०० वर्षांनंतर कोरोना ही महामारी आली आहे. याच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आहे. या लाटेसाठी सज्ज राहून मुकाबला केला तरच टिकाव लागू शकेल.

परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कशाप्रकारे कोरोनावर मात केली याचा बडेजाव त्यांनी संपूर्ण जगासमोर मारला. यामुळे आपल्या देशातील यंत्रणा ढिली पडली व पुढे उद्‌भवलेल्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात आपण कमी पडलो आहोत. परंतु आता प्रशासनाने व राज्य सरकारने कंबर कसली आहे, कोरोनाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून, सर्वांचे लसीकरण होणे तितकेच गरजेचे आहे.

याचसोबत लसींचा तुटवडा जरी होत असला तरी लसीकरणाचे योग्य नियोजनही केले जाणार आहे. अशा प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून कोरोनाला हद्दपार करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.