शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मंडळांमध्ये धुमश्चक्री, तुफान दगडफेक; २५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:26 IST

कऱ्हाड (जि.सातारा) : दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाइलवर व्हिडीओ केल्यावरून युवकांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दांडक्याने मारहाण करण्यात ...

कऱ्हाड (जि.सातारा) : दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाइलवर व्हिडीओ केल्यावरून युवकांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दांडक्याने मारहाण करण्यात आली. जोरदार दगडफेक करण्यात आली. एका जीपचेही नुकसान केले. ही घटना कऱ्हाडातील नेहरू चौकात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावरून २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. काही युवकांना अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात सोमवारी रात्री काही मंडळांच्या दुर्गादेवी मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या. अशातच रात्री दहाच्या सुमारास नेहरू चौकामध्ये दोन नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खटका उडाला. त्यातूनच जोरदार हाणामारी झाली.युवकांनी एकमेकांना दांडके, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांना पाहिल्यानंतर जमाव तेथून निघून गेला.दरम्यान, जमावाने एका जीपची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. दगडफेकीत काही युवक जखमीही झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस