वाढदिवस साजरा करताना मित्राला लागला शॉक, उपचारासाठी सातारा दवाखान्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:10 IST2018-11-24T17:02:52+5:302018-11-24T17:10:22+5:30
वाढदिवसाचे होर्डिंग लावताना अक्षय राजेंद्र माने (वय १९,रा. माजगावकर माळ, सातारा) हा युवक शॉक लागून जखमी झाला. ही घटना

वाढदिवस साजरा करताना मित्राला लागला शॉक, उपचारासाठी सातारा दवाखान्यात
सातारा: वाढदिवसाचे होर्डिंग लावताना अक्षय राजेंद्र माने (वय १९,रा. माजगावकर माळ, सातारा) हा युवक शॉक लागून जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भूविकास बँक चौकात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षयच्या ओळखीच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यासाठी तो फलक लावत होता. यावेळी अचानक त्याला शॉक लागला. हा प्रकार त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.