शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दौलतनगरातील दरोड्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:40 IST

अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपआपल्या फ्लॅटमधून जोरजोरात आरडाओरडा करत सर्व नागरिकांना जागे केले. त्यामुळे दरोडेखोरांनी काढता पाय घेतला.

करंजे : सातारा मध्यवर्ती बसस्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या दौलतनगर येथील एका सदनिकेत काहीजण दरोडा घालण्याच्या तयारीत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी आपापल्या घरातून ओरड्यास सुरुवात केली. यामुळे शेजारील लोक जागे होऊ लागल्याने दरोडेखोरांनी पलायन केले. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील दौलतनगर येथील श्री शिल्प अपार्टमेंटमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांच्या लक्षात आले. तेव्हा अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपआपल्या फ्लॅटमधून जोरजोरात आरडाओरडा करत सर्व नागरिकांना जागे केले. त्यामुळे दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. नागरिक फ्लॅटमधून बाहेर आले असता एका फ्लॅटच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. लगेच शाहूपुरी पोलीस ठाण्यास कळविण्यात आले.त्यानंतर लगेचच शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दरोडेखोरांच्या हाती तलवार, कोयता, गज व हातोडी असल्याचे दिसून आले. परंतु कोणत्याही प्रकारचे साहित्य चोरांच्या हाती न लागल्यामुळे याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नाही.

गाड्या चोरीच्या घटनांत वाढया अपार्टमेंटच्या आजूबाजूच्या ठिकाणी बऱ्याच वेळा गाड्या चोरीला जाण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दरोड्याच्या प्रकारात कोणासही दुखापत झाली नाही किंवा किमती ऐवज चोरीस गेला नसल्यामुळे अपार्टमेंटमधील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता या प्रकारावर पोलीस काय निर्णय घेतील याच्यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी