बारमाही पाणी असूनही कामे रखडली--धैर्यशील कदम :

By Admin | Updated: August 18, 2014 23:24 IST2014-08-18T21:47:30+5:302014-08-18T23:24:59+5:30

धैर्यशील कदम : तारळी वळण बंधाऱ्याला विद्यमान लोकप्रतिनिधींमुळे खो बसल्याची टीका

Due to perennial water, work done - patience: | बारमाही पाणी असूनही कामे रखडली--धैर्यशील कदम :

बारमाही पाणी असूनही कामे रखडली--धैर्यशील कदम :

तारळे : ‘आपल्याच हक्काचे पाणी आपल्याला मिळत नाही. तारळीचा उद्भव आपल्या येथूनच होतो; पण त्याचा उपयोग आपल्यासाठी होत नाही. आपण सर्वांनी साथ आणि संधी दिली तर येणाऱ्या वर्षभरात तारळी वळण बंधाऱ्याचे पाणी आपल्या शिवारात आलेले दिसेल,’ अशी ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली.
राष्ट्रीय काँग्रेसच्या संवाद यात्रेत रामकृष्णनगर, काशीळ, गांधीनगर, पाली, हरपळवाडी चोरे, मरळी या गावांतील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मारुतीशेठ जाधव, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित, भीमराव डांगे, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, शैलेश चव्हाण, धैर्यशील सुपले, अजय माने, कॅप्टन इंद्रजित जाधव, हेमंत जाधव, विकास जाधव, उमेश ताटे, सुहास पिसाळ, समीर शिकलगार, निवास घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले, ‘१९६४ साली यशवंतराव चव्हाण यांनी तारळी वळण बंधारा मंजूर केला; परंतु तारळीचे पाणी बारमाही वाहत नाही. या कारणास्तव ही योजना १९८५ साली बंद झाली; परंतु आज ही नदी बारमाही वाहून देखील कारखान्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या उपसा सिंचन योजना बंद पडू नयेत म्हणून तारळी वळण बंधाऱ्याचे काम आजपर्यंत होऊ दिले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राजेंद्र मुळक यांच्या आदेशाने या योजनेसाठी २५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी तारळी वळण बंधाऱ्याचे काम आजपर्यंत होऊ दिले नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे असणारे ६४ एम. सी. एफ. पाणी काम पूर्ण नसल्यामुळे सांगली म्हैसाळ-ताकारीला जाते.
यावेळी मारुतीशेठ जाधव, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. संवाद यात्रेस चेअरमन रघुनाथ काळभोर, सदस्य बबन काळभोर, लिंबाचीवाडी सरपंच माणिक शिंदे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय जाधव, डी. एम. मोरे, एन. एस. मोरे, हणबरवाडी सरपंच जयसिंगदादा , निगडी सरपंच निवास घोलप, पांडुरंग घोलप, मारुती पाटील, शंकर जाधव, समाधान कोळेकर, धनंजय जाधव, माधव माने यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
मतदारसंघाच्या चारही तालुक्यांतील वाडीवस्ती व सर्व गावांतील जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेतल्यानंतर या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मूलभूत व प्राथमिक प्रश्नाची सोडवणूक करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसते आणि हीच सामान्य व भोळीभाबडी जनता आता संघटित झाली आहे. जनतेमधील लोकप्रतिनिधीबद्दल असलेला असंतोष मला त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.

Web Title: Due to perennial water, work done - patience:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.