शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराची साथ पण प्रदूषणामुळे लोणंदची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:03 IST

लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : शेतपिकांचाही श्वास लागलाय गुदमरूभूमिपुत्रांना रोजगाराची आशा फोल-लोणंदचा विकास की भकास

संतोष खरात ।लोणंद : लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. मात्र, या औद्योगिकीकरणामुळे लोणंदचा विकास झालाय खरा; पण प्रदूषणामुळे स्थनिकांचाच नव्हे तर शेतपिकांचाही श्वास आता गुदमरायला लागलाय.

औद्योगिकीकरणाचा फायदा स्थानिकांना होत नाही, हेच या विकासाचे दुर्दैव म्हणावे लागेल. या औद्योगिकीकरणामुळे विकास झाला असला तरी लोणंदकर मात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेत. खंडाळा तालुक्यातील लोणंद म्हणजे कांद्याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध गाव. औद्योगिक वसाहती स्थापन होण्यापूर्वी हा खंडाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध होता. उजाड माळरान जमिनी आाणि पावसाचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.

वीर धरण अगदी शेजारी असूनही दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजलेला. वाढती बेरोजगारी आणि शेतीला पाणी नसल्याने अनेकांनी आपल्या संसाराचा गाडा गावाकडून मुंबई, पुण्याकडे वळविला होता. या भागातील काही जागा मालकांचा या औद्योगिक वसाहतीस विरोधही होता. या विरोध करणाºयांना स्थानिक नेते व त्यांच्या सहकाºयांनी औद्योगिक वसाहतीबाबतचे महत्त्व पटवून दिले. औद्योगिक वसाहतीमुळे लोणंदच्या युवकांना रोजगार उपलब्ध होणार होता. या पडीक जमिनीला चांगला भावही मिळणार असल्याने विरोधक शांत झाले. लोणंदमध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या नामफलक मोठ्या दिमाखात उभा राहून लोणंदकरांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र रोजगाराचे स्वप्न अर्पूण राहिले. 

लोणंदमधील जनतेने लोणंदमध्ये औद्योगिक वसाहतीबाबत काही स्वप्ने पाहिली होती. ज्या भावनेने व समर्पण वृत्तीने औद्यागिक वसाहत स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले गेले व औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी ज्या लोकांनी त्याग केला त्यांना मात्र दुर्दैवाने अपेक्षित फळ मिळाले नाही.- अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, ज्येष्ठ नेतेज्या लोकांनी यासाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या. त्या भूमिपुत्रांना आता प्रदूषणामुळे जगणे असह्य झाले आहे. औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यावर लोणंदचीच नव्हे तर तालुक्याची बेराजगारी कमी हाईल, अनेक भूमिपुत्रांना कायमचा रोजगार मिळेल ही भाबडी आशा फोल ठरली आहे.- प्रा. रघुनाथ शेळके, लोणंद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण