शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची औषधे धूळखात !

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

मुकी जितराब धोक्यात : राजवाड्यावरील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रुग्णालयातील दयनीय स्थिती

सातारा : राजवाडा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती सातारा यांच्या पशू वैद्यकीय दवाखान्यामधील औषधे गोडाऊनमध्ये धूळखात पडले असून, यामध्येच औषधी पोती बॉक्स ठेवली गेली आहेत. त्यामुळे पशूंना संजीवनी देणारे या औषधांचा पशूंना कितपत फायदा होईल यावर शेतकऱ्यांना शंका येऊ लागली आहे.जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशू वैद्यकीय दवाखाने सुरू आहेत. त्यापैकी साताऱ्यातील राजवाडा परिसरातील दवाखान्याची व्यवस्था असून, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पशूंच्या औषधोपचारासाठी येतो; परंतु सध्या या दवाखान्यामधील परिसरातील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. दरवाजाच्या काना-कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर याच दवाखान्याच्या मधोमधी असलेल्या वस्तुला औषधी पोती बॉक्स ठेवण्यासाठी गोडाऊन म्हणून वापर करीत आहे.या गोडाऊनला सर्वत्र खिडक्या असून, संपूर्ण खिडक्यांना तावदान नसल्याने हवेने येणारा कचरा, माती हे या औषधांवर बसत असल्याने या गोडाऊनमधील औषधी वस्तू, पोती, बॉक्स ही धुळीने माखली आहेत. तर गोडाऊनमध्ये सर्वत्र जाळ्या पसरल्या आहेत. असे असताना हे औषध जनावरांना लाभदायी ठरेल का? असा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडला आहे.दरम्यान, दवाखान्यातील परिसराबरोबर येथील पाणी व्यवस्थाही अत्यंत बिकट असल्याचे निदर्शनास येते. येथील हौद हा रिकामाच पडला आहे. (प्रतिनिधी) म्हणे कर्मचारीच नाहीत!याविषयी संबंधितांशी बोलले असता, त्यांनी सांगितले की, ‘दिवाळीच्या सुट्टीमुळे कर्मचारी आले नाहीत. पालिकेला स्वच्छतेसाठी कर्मचारी मागितले असून, ते लवकरच या ठिकाणी कर्मचारी पाठवून देणार असून, याची तातडीने स्वच्छता करून घेतली जाईल, असे सांगण्यात आले.’