शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

माणचा दुष्काळ मेला.. त्याच्या मातीला चला! शेवटच्या दिवशीही श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:03 IST

माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे.

ठळक मुद्देवीसहून अधिक गावांनी ८७ गुणांचा सोडविला पेपर; विजय निश्चितचा विश्वास

नवनाथ जगदाळे ।दहिवडी : माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. वीसपेक्षा जास्त गावांनी ८७ गुणांचा पेपर सोडवल्याने आपलाच नंबर, असा विश्वास आहे. दरम्यान, वावरहिरे येथे मंगळवारी दुष्काळाची अंत्ययात्रा काढली.

माणमध्ये दररोज १५ ते २० हजार लोक श्रमदान करू लागली. महाश्रमदानात एका दिवसांत ३५ हजार लोकांनी विक्रमी श्रमदान केली. तहसीलदार सुरेखा माने, समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार यांनी तालुका पिंजून काढला. सहा महिने अगोदरच चारशेहून अधिक ग्रामसभा झाल्या. माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव नामदेव भोसले, वाहतूक निरीक्षक गजानन ठोंबरे, अधिकारी प्रवीण इंगवले यांच्या मदतीने चाळीसहून अधिक बैठका झाल्या.

दानवलेवाडी, नरवणे, धामणी येथे ७ एप्रिलच्या मध्यरात्री बाराला पहिला टिकाव टाकला. मशाल फेरी काढली. अनेक ठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध ग्रामस्थांनीही श्रमदान केले. खुटबाव, भाटकी, रांजणी या ठिकाणी लोक अंत्यविधी करून कामाला आले. दिवड, डंगिरेवाडी, खुटबाव, कुकडवाड, भांडवली, मलवडी येते वधूवरांनी लग्नापूर्वी श्रमदान केले. गोंदवले खुर्द येथील रोहित व रक्षिता या बहीण-भावाने काम करून इतरांना प्रेरणा दिली. गाडेवाडीत शालेय मुलींनी आखणी व मोजणीची जबाबदारी घेतली.

खासदार शरद पवार, मंत्री महादेव जानकर, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार वंदना चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अमीर खान, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हेमांगी कवी, गिरीश कुलकर्णी यांनी उत्साह वाढवला. माजी आमदार प्रभाकर घार्गे, आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, अनिल देसाई, सुरेखा पखाले, युवराज सूर्यवंशी, सिद्धनाथ पतसंस्था, अहिंसा पतसंस्था, चैतन्य पतसंस्था, प्रियदर्शनी पतसंस्था, ड्रीम फाउंडेशन, नामदेव भोसले, आयुक्त वंदना धायगुडे यांनी मदत केली. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष भरतेश गांधी यांनी तालुक्यात मशीन उपलब्ध करून दिल्या.‘लोकमत’मुळे चळवळीला बळमुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहिली. माण तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप चळवळीला ‘लोकमत’मुळं बळ आलं,’ असे कौतुक मंत्री महादेव जानकर यांनी केले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर