दुष्काळ संपवणारं पाणी आलं रं आलं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:50 PM2019-04-25T23:50:07+5:302019-04-25T23:50:25+5:30

सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच ...

 Drought has come to the water ..! | दुष्काळ संपवणारं पाणी आलं रं आलं..!

दुष्काळ संपवणारं पाणी आलं रं आलं..!

googlenewsNext

सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. जलवाहिनीतून सुटलेलं हे पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने निघालं असून, ग्रामस्थांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालाय.
मूळत: टेंभू उपसा सिंचन योजना ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. या योजनेतून २१८ गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये कºहाड तालुक्यात एक, सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील ३२ आणि सांगली जिल्ह्यातील १८५ च्या आसपास गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यासाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. कोयना, तारळी आणि वांग धरणातून हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यात कोयनेतील सर्वाधिक १८ टीएमसी पाणी या टेंभू योजनेतून सिंचनासाठी दिले जाते. सद्य:स्थितीत या योजनेचे काम प्रगतिपथावर असून, अजूनही कवठेमहंकाळ, सांगोला तालुक्यांत कालव्याची कामे सुरू आहेत. लवकरच ही योजना पूर्णत्वास जाऊन तेथील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे; पण ही योजना सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जात असताना त्यातील पाणी माण आणि खटाव तालुक्यातील गावांना मिळावे, अशी मागणी होती. त्याप्रमाणे अनेकांनी लढा सुरू केला होता. त्याला यश आले.
सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ ‘दलघमी’ पाणी मिळत असून, रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. यामध्ये वरकुटे मलवडीसह काळचौंडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी आदी गावांना लाभ मिळणार आहे. शिवाय हे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येणार आहे. या तलावाखाली चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. त्यामुळे संबंधित गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. तसेच बंधाºयातही पाणीसाठा होण्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्याने काहीप्रमाणात शेतीपाण्याचाही प्रश्न संपुष्टात येईल. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळत आहे.
एकंदरीतच सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया या टेंभू योजनेमुळे कायम दुष्काळी असणाºया माण तालुक्यातील अनेक गावांची तहान कायमस्वरुपी भागणार आहे.

Web Title:  Drought has come to the water ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.