शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दुष्काळ हटतोय अन् शेळीपालन व्यवसाय घटतोय-माण-खटाव तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:55 AM

सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत

ठळक मुद्देजनावरांच्या संख्येत दीड लाखाने घट; स्थानिकांचे रोजगारासाठी पुणे, मुंबईला स्थलांतर

योगेश घोडके ।सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी दीड लाखाने शेळ्या मेंढ्यांची संख्येत घट झाली आहे.जिल्ह्यात दुष्काळ पट्ट्यात माण, खटाव, फलटण ही तालुके येतात. या तालुक्यांत प्रमुख्याने शेती व मेंढपाळचा मुख्य व्यवसाय. मात्र पाणी व चाऱ्याच्या टंचाईमुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागामार्फत केलेल्या २०१२ च्या पशुगणनेनुसार या तालुक्यात शेळी व मेंढ्यांच्या प्रमाणात १ लाख ३७ हजार १८६ इतकी घट झाल्याची दिसून येत आहे.माण-खटाव या दोन तालुक्यांत शेळ्या व मेंढ्यांची अधिक प्रमाणात आहे. मात्र याठिकाणी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. या तालुक्यांतील लोक हंगामानुसार शेतीती उत्पन्न घेत असतात. तसेच जोडधंदा म्हणून शेळीपालनचा व्यवसाय करतात. या तालुक्यात सतत दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबे कामासाठी पुणे-मुंबई या सारख्या शहरांमध्ये जाऊन वास्तव करत आहेत. काहीजण शेतजमीन देखरेखीसाठी घराकडे आई-वडिलांनाच सोडून जातात. पूर्वी या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी शेळा, मेंढ्यांचा कळप असायचा. दुष्काळात ही मंडळी आपली लवाजमा घेऊन सुगम भागात जात असे.सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करू लागले. त्यांना चाराही मिळेनासा झाल्याने अनेक कुटुंबे शेळ्या,मेंढ्या विक्रीस सुरुवात केली. हाताला व्यवसाय मिळत नसल्याने मेंढपाळची मुले ही परंपरागत व्यवसाय न करता शिक्षणात पुढे जाऊन मोठमोठ्या शहरात विसावू लागली.पशुगणेनुसार माण-खटाव तालुक्यांतील आकडेवारी२००७ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ८८ हजार २४१ तर मेंढ्या ९७हजार २५ व खटाव तालुक्यात ५९ हजार ५२ तर मेंढ्या ३९ हजार ३९१ अशी नोंद करण्यात आली.२०१२ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ७८ हजार ८८५ तर मेंढ्या ९४ हजार २६६ व खटावमध्ये २९ हजार ०६८ तर मेंढ्या १८ हजार ७६५ अशी नोंद करण्यात आली.ूमाण व खटाव तालुक्यांत पाणी व चाºयाची टंचाई निार्मण झाली आहे. तसेच युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पारंपरिक व्यवसाय सोडून मुले शिक्षणात रमली आहेत. सध्या उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.- विनोद पवार, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी