पाणी पिताय... मग जरा थांबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST2021-09-06T04:42:44+5:302021-09-06T04:42:44+5:30
सातारा : आपण जे पाणी पितोय ते गाळून व उकळून पितोय का? ते पाणी किती शुद्ध आहे किंवा नाही, ...

पाणी पिताय... मग जरा थांबा !
सातारा : आपण जे पाणी पितोय ते गाळून व उकळून पितोय का? ते पाणी किती शुद्ध आहे किंवा नाही, याची तपासणी करतोय का? पाणी पिण्यापूर्वी ते निर्जंतूक करतोय का? असे प्रश्न आपल्याला जर कोणी विचारले तर उत्तर नाही हेच येणार. कारण दूषित पाणी हे अनेक आजारांचे मूळ कारण असून, साथरोग टाळण्यासाठी पाणी पिताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
(चौकट)
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
उलटी, टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपेटायटीस ए/ई, काविळ
(चौकट)
आजारांची लक्षणे
गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात.
- टायफॉईड दूषित पाण्यामुळे होतो. टायफॉईड झाल्यास रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते. उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.
- उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणे ही काविळीची लक्षणं आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणं कायम राहतात.
(चौकट)
पाणी पिताना ही घ्या काळजी...
- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.
- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.
- त्यात मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.
- त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ तळाशी जातो.
- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.
(चौकट)
सातारा शहराला होणारा पाणी पुरवठा
कास तलाव : ५.५० लाख लीटर
शहापूर : ७.५० लाख लीटर
जीवन प्राधिकरण : २७ लाख लीटर
(चौकट)
प्रशासनाकडून घेतली जातेय खबरदारी
सातारा शहरात पालिकेची दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. ही केंद्र पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गाळमुक्त केली जातात. गढूळ पाणी निवळण्यासाठी चुुना आणि तुरटी तर निर्जंतूक करण्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकली जाते. फिल्टर बेडमधून पाणी शुद्ध करण्याचे काम निरंतर सुरू असते.