डॉ. अतुल भोसलेंनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य, कार्यकर्त्यांच्यात रंगली चर्चा
By प्रमोद सुकरे | Updated: June 22, 2023 14:25 IST2023-06-22T14:24:44+5:302023-06-22T14:25:17+5:30
कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कराडचे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यातील मैत्रिचे नाते सर्वश्रुत आहे. त्याचे ...

डॉ. अतुल भोसलेंनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य, कार्यकर्त्यांच्यात रंगली चर्चा
कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कराडचे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यातील मैत्रिचे नाते सर्वश्रुत आहे. त्याचे प्रत्यंतर गरुवारी कराडात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस कराड दौऱ्यावर असताना त्यांचे गाडीचे सारथ्य डॉ. अतुल भोसले यांनी केले.
कराडला देवेंद्र फडणवीस आले असता सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांची त्यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी गाडीचे स्वतः सारथ्य करत फडणवीस यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना भोसले यांना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद व राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. या मैत्रिचा भविष्यात भोसले यांना फायदा होईल अशी कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे.