‘कोयना’चे दरवाजे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:37 IST2017-08-01T17:35:46+5:302017-08-01T17:37:10+5:30
पाटण (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून मंगळवारी पूर्णपणे पाऊस थांबला आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता बंद केले. धरणात सध्या ८३.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

‘कोयना’चे दरवाजे बंद
पाटण (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून मंगळवारी पूर्णपणे पाऊस थांबला आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता बंद केले. धरणात सध्या ८३.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, पाटण, कोयना, नवजा परिसरात यंदा दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही दिवसांत धरणात विक्रमी पाणीसाठा झाला. दररोज सरासरी दोन ते चार टीएमसीने वाढ होत होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत प्रथमच ३० जुलैला कोयनाचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली. धरणाचे सहा वक्र दरवाजे रविवारी सकाळी अकरा वाजता दोन फुटांनी उघडले. त्यानंतर पावसाचा जोर मंदावल्याने सोमवारी ते एक फुटांवर आणले होते. धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरणात १४ हजार १२० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे दरवाजे मंगळवारी दुपारी बंद करण्यात आले. |