करू नका कीव... आम्हांलाही आहे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:39+5:302021-01-04T04:32:39+5:30

विद्युत पुरवठा खंडित झाला तर वीज कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या जातात. जीव धोक्यात घालून शहर प्रकाशमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांही जीव आहे ...

Don't do Kiev ... we have life too | करू नका कीव... आम्हांलाही आहे जीव

करू नका कीव... आम्हांलाही आहे जीव

Next

विद्युत पुरवठा खंडित झाला तर वीज कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या जातात. जीव धोक्यात घालून शहर प्रकाशमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांही जीव आहे हे आपण नेहमीच विसरतो. साताऱ्यातील मल्हारपेठेत वीज खांबावर सुरू असलेली ही कसरत बरंच काही सांगून जात आहे. (छाया : सचिन काकडे)

०००००००

सारांश

थंडी गायब

सातारा : साताऱ्यात गेल्या आठवड्यात चांगलीच थंडी वाढली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून संपूर्ण थंडी गायब झाली आहे. त्यामुळे अनेकदा शासकीय कार्यालय, घरांमध्ये पंखे सुरू करावे लागत आहेत.

०००००००

निकम यांची निवड

सातारा : येथील जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. शैलेश आनंदराव निकम यांची भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे. निकम यांनी यापूर्वी अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला आहे. ते विविध संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पहात आहेत.

०००००००००

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सातारा : भारतीय रक्षक आघाडीच्यावतीने सातारा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी डॉ. दीपांजली पवार, भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अमर गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, रक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे, मनोज घाडगे, शिला गीते, प्रकाश भिसे उपस्थित होते. ‘सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला म्हणून आज कोट्यवधी महिलांना शिक्षण मिळत आहे. म्हणून सावित्रीबाई फुलेंबाबत प्रत्येकांच्या मनात कृतज्ञता असायला हवी,’ अशा भावना डॉ. दीपांजली पवार यांनी व्यक्त केल्या.

०००००००००

कास रस्त्यावर गर्दी

सातारा : साताऱ्यातील असंख्य तरुणाई पोलीस, सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी खडतर मेहनत ते घेत आहेत. त्यामुळे सातारा-कास मार्गावर लांबच लांब अंतरापर्यंत धावत जात असतात. त्या ठिकाणी जाऊन जोर बैठका काढत आहेत. दिवस उजाडण्यापूर्वी परत येतात.

०००००००००

नाकाबंदी कायम

सातारा : सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यपान करून गाड्या चालविण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. ती नाकाबंदी अजूनही कायम ठेवली आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी केली जाते.

आडवा फोटो

ये दादाऽऽऽ ते बघ मोबाईलवेडे काका!

मोबाईलने तर प्रत्येकालाच वेड लावले आहे. अनेकजण ठरावीक वेळेनंतर सोशल मीडियावर काही आले तर नाही ना? हे पहात असतात. साताऱ्यातील रयत शिक्षणच्या समोरही एक दुचाकीस्वार गाडी उभी करून मोबाईलमध्ये बघत होते. नेमके तेथील भिंतीवर लहान मुलांची चित्रे रेखाटलेली आहेत. हा क्षण बघितल्यावर ‘ते बघ मोबाईलवेडे काका’ असे तर चित्रातील मुलं म्हणत नसतील ना? असे वाटते. (छाया : जावेद खान)

०३माण-वॉटर

माणमधील ओढ्यांना जानेवारीतही पाणी

दुष्काळी माण तालुक्यातील गंगोती येथील ओढा भरून वाहत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या वाढत्या तापमानातसुद्धा ओढ्याकाठच्या हिरवाईने नैसर्गिक सौंंदर्यात भर घातली आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)

Web Title: Don't do Kiev ... we have life too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.