Satara: ओंड येथे डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन, कारण अस्पष्ट
By प्रमोद सुकरे | Updated: July 31, 2024 14:15 IST2024-07-31T14:14:46+5:302024-07-31T14:15:20+5:30
कराड : ओंड (ता. कराड ) येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आज, बुधवारी सकाळी आपल्या दवाखान्यातच ...

Satara: ओंड येथे डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन, कारण अस्पष्ट
कराड : ओंड (ता. कराड ) येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आज, बुधवारी सकाळी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कराड तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओंड गावची ओळख आहे. या ठिकाणी डॉ. हेमंत रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ.दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते.ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल होते.तर पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा,मुलगी असे परिवारासह रहात होते.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी डॉ. हेमंत रेळेकर हे आपल्या दवाखान्यात आले. परंतु परत वर घरात बराचवेळ परतले नाहीत. कुटुंबीयांनी दवाखान्यात पाहिले असता त्यांनी दवाखान्यातलीच एका खोलीमध्ये गळफास घेतल्याचे समोर आले. दरम्यान सदरची घटना समजतात दुपारी १२च्या सुमारास कराड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.