पोलीस बंदोबस्तात चाचण्या करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:39+5:302021-06-09T04:47:39+5:30
येथील प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय ...

पोलीस बंदोबस्तात चाचण्या करा!
येथील प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. संजय पाटील, शारदा क्लिनिकचे डॉ. चिन्मय एरम, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार, तालुका नर्सिंग अधिकारी अनिता कदम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी दिघे म्हणाले, कऱ्हाडमध्ये बाधितांची संख्या सर्वाधिक होऊ नये, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कातील लोकांचेही टेस्टिंग करणे आवश्यक आहे. जेथे आवश्यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात तपासणीसाठी लोक न्यायचीही तयारी ठेवावी, अन्यथा बाधितांची संख्या वाढून कऱ्हाड तालुका ‘हॉटस्पॉट’ होईल. त्यामुळे तातडीने उपाययोजना राबवाव्यात.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन केले.
- चौकट
वशिलेबाजी खपवून घेणार नाही!
कोरोनाचे लसीकरण करताना वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष ठेवावे. असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. लसीकरणात वशिलेबाजी, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी ताकीद या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.