अधिकाऱ्यांनो झेडपीत विनाकरण फिरू नका-अधिकाऱ्यांचा आदेश : कामचुकारना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:06 PM2019-07-05T12:06:47+5:302019-07-05T12:08:28+5:30

वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक अधिकारी आणि कर्मचारी झेडपीमध्ये येऊन विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी अशा कर्मचाºयांना चाप लावला आहे. झेडपीमध्ये यायचे असेल तर वरिष्ठ अधिकाºयांची परवागनी घेऊनच यावे,

Do not panic in the ZPP officers | अधिकाऱ्यांनो झेडपीत विनाकरण फिरू नका-अधिकाऱ्यांचा आदेश : कामचुकारना चाप

अधिकाऱ्यांनो झेडपीत विनाकरण फिरू नका-अधिकाऱ्यांचा आदेश : कामचुकारना चाप

Next
ठळक मुद्देजिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी आदेशात खडसावून सांगितले आहे.

दत्ता यादव ।

सातारा : वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक अधिकारी आणि कर्मचारी झेडपीमध्ये येऊन विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी अशा कर्मचाºयांना चाप लावला आहे. झेडपीमध्ये यायचे असेल तर वरिष्ठ अधिकाºयांची परवागनी घेऊनच यावे, असा आदेश काढला असून, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून झेडपीच्या आरोग्य विभागामधील वर्दळ कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपक्रेंद्र आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन प्रमुखांची परवानगी न घेता खासगी कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये दिसत होते. काम सोडून इतर उद्योग सुरू असल्यामुळे याला कुठेतरी पायबंद बसायला हवा, यासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतलेले अनिरुद्ध आठल्ये यांनी अधिकारी व कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटनेला त्यांनी लेखी आदेश दिले आहेत.

कार्यालयीन वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील बरेच अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारची कार्यालय प्रमुखांची पूर्व परवानगी न घेता जिल्हा कार्यालयात येत आहेत. ही बाब योग्य नाही. वास्तविक पाहता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांनी २४ तास मुख्यालयी राहून आरोेग्य सेवा पुरवणे आवश्यक आहे. त्यामुळे काही कार्यालयीन अथवा अन्य कामकाजासाठी मुख्यालय सोडण्यापूर्वी आपल्या कार्यालयातील प्रमुखांची पूर्व परवानगी घेऊनच मुख्यालय सोडणे गरजेचे आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांवर तत्काळ प्रशासकीय कारवाईही करण्यात येणार असल्याचे त्यांनी लेखी आदेशात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हे लेखी आदेश तालुका पातळीवरील प्राथमिक आरोेग्य केंद्रात पोहोचले आहेत. त्यामुळे या आदेशाची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे. एरवी झेडपीच्या आरोग्य विभागामध्ये असलेली अधिकारी आणि कर्मचाºयांची वर्दळ पूर्णपणे कमी झाल्याचे दिसून येत आहे.

परस्पर वरिष्ठ अधिकाºयांना भेटणे गंभीर !
काही तांत्रिक अथवा कार्यालयीन कामकाजाच्या अडचणीसंदर्भात संघटनेमार्फत काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत विना परवानगी परस्पर वरिष्ठ अधिकाºयांना भेटत आहेत. तसेच कामकाजाबाबत तक्रारी करतायत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे आपण कामकाजाबाबत हलगर्जीपणा करत असल्याचे निष्पन्न होत आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांनी खबरदारी घ्यावी, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी आदेशात खडसावून सांगितले आहे.

Web Title: Do not panic in the ZPP officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.