मानधन नको; पगारच द्या !

By Admin | Updated: December 1, 2014 00:20 IST2014-11-30T21:20:50+5:302014-12-01T00:20:45+5:30

अंगणवाडी सेविका : शुक्रवारी देशातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

Do not honor; Give salaries! | मानधन नको; पगारच द्या !

मानधन नको; पगारच द्या !

सातारा : कॉ. चंद्रेश्वरी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, मानधनाऐवजी पगार द्या, अंगणवाडीचे खासगीकरण करू नका यासह अन्य मागण्यांसाठी देशातील सुमारे ४४ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रत्येक जिल्हास्तरावर दि. ५ रोजी आंदोलन करणार आहेत.
याबाबत येथील शिक्षक भवनमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाचे महासचिव शौकतभाई पठाण, राज्याध्यक्षा मंगल जेधे, जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे, सुजाता बोबडे आदी उपस्थित होते.
पठाण म्हणाले, ‘कॉ. चंद्रश्वेरी आयोगाच्या शिफारशीनुसार सेविका आणि मदतनिसांना किमान १५ हजार रुपये पगार मिळालाच पाहिजे, वेळेत मानधन देण्यात यावे, वाढीव मानधन फरक देण्यात यावा, दि. ३० एप्रिल २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या सेविका, मदतनिसांना पेन्शनचा लाभ देण्यात यावा, अंगणवाड्याचे खासगीकरण रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
यामधील काही मागण्या या केंद्र शासनस्तरावरील असून, काही राज्यस्तरावरील आहेत. दोन्हीही शासनाने आश्वासनाशिवाय काही दिले नाही. त्यामुळे सेविका आणि मदतनिसांना पुन्हा तीव्र आंदोलन करावे, लागत आहे. (प्रतिनिधी)

गुरुवार परजवरून सुरुवात
दि. ५ रोजी दुपारी सातारा जिल्ह्याच्या मोर्चाला गुरुवार परज येथून सुरुवात होणार आहे. यावेळी हजारोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस मोर्चात सहभागी होतील, असे शौकतभाई पठाण यांनी सांगितले.

Web Title: Do not honor; Give salaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.