जिल्हा प्रशासनाने २० मिळकतीवरील भूत उतरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:28+5:302021-09-11T04:41:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने २० मिळकतींवर ...

जिल्हा प्रशासनाने २० मिळकतीवरील भूत उतरवले
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने २० मिळकतींवर वर्ग दोनच्या जमिनी वर्ग १ केलेल्या आहेत.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग १ कारण यामध्ये विलंब होत होता. अनेक वेळा निवेदने देऊनदेखील या प्रकरणात कारवाई होत नसल्याने २३ ऑगस्टला माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे व जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष एस. जी. पारेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तब्बल वीस प्रकरणावर अंतिम आदेश देऊन वर्ग-१ चे आदेश मंजूर झालेले आहेत. सुमारे एकशे दहा प्रकरणावर चलनाने अधिमूल्य भरण्याचे आदेश मंजूर झाले आहेत व इतर प्रकरणावर कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणात एक खिडकी योजना राबविली पाहिजे. चलन अधिक मूल्याचे चरण जिल्हाधिकारी कार्यालयातील भरून घेतले पाहिजे, शासन निर्णयची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने मुदतवाढ करण्याकरिता प्रस्ताव सादर करावा या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.