जिल्हा प्रशासनाने २० मिळकतीवरील भूत उतरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:07+5:302021-09-08T04:47:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने २० मिळकतींवर ...

The district administration exorcised the ghost on 20 properties | जिल्हा प्रशासनाने २० मिळकतीवरील भूत उतरवले

जिल्हा प्रशासनाने २० मिळकतीवरील भूत उतरवले

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने २० मिळकतींवर वर्ग दोनच्या जमिनी वर्ग १ केलेल्या आहेत.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये विलंब होत होता. अनेक वेळा निवेदने देऊनदेखील या प्रकरणात कारवाई होत नसल्याने २३ ऑगस्ट रोजी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे व जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष एस. जी. पारेख यांच्या नेतृत्त्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी वहात आंदोलन केले होते.

निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तब्बल वीस प्रकरणावर अंतिम आदेश देऊन वर्ग-१चे आदेश पारित झालेले आहेत. सुमारे एकशे दहा प्रकरणांवर चलनाने अधिमूल्य भरण्याचे आदेश पारित झाले आहेत. इतर प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणात एक खिडकी योजना राबवली पाहिजे. चलन अधिक मूल्याचे चरण जिल्हाधिकारी कार्यालयात भरून घेतले पाहिजे. शासन निर्णयाची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने मुदतवाढ करण्याकरिता प्रस्ताव सादर करावा. या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: The district administration exorcised the ghost on 20 properties