कामगार दिनी स्वच्छता कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST2021-05-03T04:32:38+5:302021-05-03T04:32:38+5:30

महाबळेश्वर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारीमार्फत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पल्लवी ...

Distribution of safety equipment to cleaning workers on Labor Day | कामगार दिनी स्वच्छता कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप

कामगार दिनी स्वच्छता कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप

महाबळेश्वर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारीमार्फत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले.

कोरोना संसर्ग वाढत असताना जोखीम पत्करून जबाबदारी व कर्तव्य नियमितपणे पार पाडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती आदर, सन्मान व त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हिलदारीमार्फत सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात अशा प्रकारची कीट देण्यात येणार आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हीच बाब लक्षात घेत या सुरक्षा साधनांमध्ये चांगल्या प्रतीचे बूट, सुरक्षितरित्या कचरा हाताळण्यासाठी हँड ग्लोव्हज, रिफ्लेक्टर जॅकेट इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, स्वच्छता मुकादम मनोज चव्हाण व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Distribution of safety equipment to cleaning workers on Labor Day