मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:55 PM2021-03-13T15:55:50+5:302021-03-13T16:03:05+5:30

watershortege satara-खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

Disruption of power supply of Mayani Regional Pipeline Scheme | मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देमायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित तीन कोटींची थकबाकी : ग्रामस्थांनी कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून मायणी परिसरातील मायणीसह चितळी, गुंडेवाडी, मोराळे, व मरडवाक या पाच गावांसाठी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मायणी प्रादेशिक नळ पाणी परवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना सुरू केल्यापासून विविध कारणांमुळे ही योजना सतत बंद राहत होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने व लहान गावांना योजना न परवडणारी असल्याने चितळी मोराळे गुंडेवाडी व मरडवाक या चार गावांनी या योजनेतील आपला सहभाग काढून घेतला. तेव्हापासून केवळ मायणी गावासाठी ही योजना कार्यान्वित होती. मात्र या योजनेवर असलेली शंभर हाऊस पॉवरची मोटर व त्याचे येणारे लाईट बील व मायणी गावासही न परवडणारे आहे.

या योजनेचे थकीत वीज बिल ३ कोटी १२ लाखाचा आसपास गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी मायणी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास दोन लाख रुपये थकीत बिलापोटी भरले होते. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असल्याने दोन लाख भरल्यानंतर ही संबंधित विभागाने अधिक पैसे भरण्याची मागणी करत योजनेचा पुरवठा खंडित केला. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मायणीच्या पश्चिम व उत्तर भागातील लक्ष्मीनगर, सराटे मळा, चांदणी चौक परिसर मोराळे रोड मरडवाक रोड कचरेवाडीतील काही भाग या ठिकाणी या ठिकाणातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून वीजपुरवठा सुरळीत करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पर्यायी व्यवस्थाही अशक्य

सुमारे तीन कोटी रुपये प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे बील थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने थोडी रक्कम भरली आहे. तसेच नवीन योजना किंवा इतर पर्यायी व्यवस्था लगेच बघणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी आपला थकित घरफळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सचिन गुदगे यांनी केले आहे.

Web Title: Disruption of power supply of Mayani Regional Pipeline Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.