तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:43 AM2021-08-12T04:43:41+5:302021-08-12T04:43:41+5:30

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त ...

Disputes in dispute-free villages reach police station! (Template 1021) | तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

Next

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त समित्या या राहिलेल्याच नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज होत नसल्याने तंटामुक्त झालेल्या गावांतील तंटेही आता पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. यावरून तंटामुक्त समित्या किती फायदेशीर ठरतात हे यावरून सिद्ध होते.

नजर आकडेवारीवर...

तंटामुक्त समित्या...

माण ४१

खटाव ५५

कोरेगाव ५८

फलटण ६२

कऱ्हाड ६५

...............................

समित्या नावालाच...

- अनेक गावांत तंटामुक्त समित्या या नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण, ग्रामपंचायतीत सत्ता ज्यांची असते. त्याच गटाचा समितीचा अध्यक्ष बहुतांशी ठिकाणी असतो. त्यातच गावांतील राजकारण टोकाचे असेल तर अशा समित्या या वाद मिटविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आलेले आहे.

- ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायती असतात. तशाच ४, ५ हजार मतदार असणाऱ्याही आहेत. अशा ठिकाणी वाद अधिक राहतात. त्यामुळे वाद कमी होत नाहीत, तसेच ते सुटलेही जात नाहीत, हे वास्तव आहे.

..............................................

निवडणूक झालेल्या ठिकाणी समितीच नाही...

ग्रामपंचायत निवडणूक झाली की ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करण्यात येते; पण जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैअखेर ८७९ ग्रामपंचायतींची निवडणूक झालेली आहे. कोरोनामुळे सध्या ग्रामसभाच घेता येत नाही. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावांत तंटामुक्त समिती अस्तित्वातच नाही, तर जिल्ह्यातील जवळपास १५ ते २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

................................................

Web Title: Disputes in dispute-free villages reach police station! (Template 1021)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.