शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात रुग्ण नदीकाठीच गतप्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:01 IST

रवींद्र माने। लोकमत न्यूज नेटवर्क ढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने ...

रवींद्र माने।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले. कुठे पूल तुटले, तर कुठे घरे उद्ध्वस्त झाली. एके ठिकाणी वांग नदीकाठची पेटती चिताही पुरातून वाहून गेली.हौदाचीवाडी-जिंती येथील एकाला पुराच्या पाण्याने अडवून ठेवल्याने ओढ्याकाठीच उपचाराविना जीव गमवावा लागला. एकेकाळी गावांचे संरक्षण करणाऱ्या डोंगरांनीही धीर सोडल्याने गुढे आणि उमरकांचन येथील गावकऱ्यांचा प्रवास जीव मुठीत घेऊन चालू आहे.कधी वादळ, कधी भूकंप, कधी पाऊस तर कधी दुष्काळ. अशा विळख्यात सापडलेल्या ढेबेवाडी विभागातील सुमारे साठ गावांसह दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांंतील जनता आपला जीवन प्रवास करत आहे. वाल्मिकी पठाराला मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. मात्र यंदा पावसाने हाहाकार माजवल्याने पठारावरील पुलांसह रस्तेही वाहून गेले. येथील जनता संपर्र्कहीन झाली आहे.सलग सोळा दिवस काढणे येथील पूल पाण्याखाली गेल्याने आणि त्यामध्ये हा पूल अर्धा वाहून गेल्याने येथील दळणवळणच थांबले आहे. काढणे परिसरातील शेतकºयांची पावसाने दैना उडविल्याने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाली आहेत.गुढे गावातील बडेकर वस्तीलगत असलेल्या वनविभागाच्या डोंगरकड्यांनी जनतेची झोपच उडवली आहे. वस्तीलगत असलेल्या डोंगरावर भलेमोठे दगड वर्षानुवर्षे वास्तव्य करत आहेत. मात्र यावर्षी झालेल्या पावसाने त्या दगडांचाच मातीचा आधार वाहून गेल्याने आता अनेक वर्षे साथीदार बनून राहिलेले दगड कधी वैर बनतील हे सांगता येत नाही. याठिकाणी नेहमीच वर्दळ असल्याने प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिंती जितकरवाडीतील जनतेने तर आतापर्यंत खूप सहन केले. येथील नजीकच्या ओढ्यावरील पुलाचे स्वप्न यावर्षी पूर्णही झाले. मात्र पहिल्याच पावसात साकव वाहून गेल्याने पुन्हा शिड्यांचा आधार घ्यावा लागला. कुठरे पवारवाडीनजीकचा पूलच वाहून गेल्याने जनतेचे हाल झाले.पंधरा दिवस शाळेला दांडी...विभागात सलग पंधरा दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. शासनानेही याची दखल घेत शाळांना सहा दिवस सुटी जाहीर केली. मात्र त्यानंतर सुद्धा पूरपरिस्थिती आणि रस्तेच वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना पंधरा दिवस शाळेला दांडी पडली.शंभराहून अधिकघरांची पडझड...ढेबेवाडी विभागात चिखल मातीच्या घरांची संख्या जास्त आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसाने या घरांच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने शेकडो संसार भर पावसातही उघड्यावर होते.