नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. यासाठी संमेलने आवश्यक असून, शासन म्हणून मदत करण्यामध्ये आम्ही कोठेही कमी पडणार नाही. लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे पाहिले नाही, मग माय मराठीसाठी कशाला खिशाकडे पाहू. तसेच, राज्यातील प्रत्येक बसस्थानकात व नगरपालिका इमारतीत पुस्तकांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात गाळे व दुकान देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.
‘करतो व बघतो,’ हे शब्द आमच्या डिक्शनरीत नाही
स्वराज्याची पायाभरणी झाली, त्याच माझी जन्मभूमी असणाऱ्या साताऱ्यात साहित्य संमेलन झाल्याचा आनंद आहे. आगामी १००वे संमेलनही जोरात आणि ‘न भुतो, न भविष्यती’ ठरेल. मी मुख्यमंत्री असताना साहित्य संमेलनाचा निधी ५० लाखांवरून दोन कोटी केला. आता सातारा संमेलनालाही मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी तीन कोटींचा निधी दिला. करतो व बघतो, हे शब्द आमच्या डिक्शनरीत नाहीत. ‘नो रिझन ऑन द स्पॉट डिसीजन’, असा डायलॉगही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मारला.
पुस्तकांवरील १८ टक्के जीएसटी कमी करणार
महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती होणार नाही. मराठी भाषेचाच मान आणि सन्मान वाढविला जाईल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन कार्यक्रमात घेतलेल्या भूमिकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केला. शिवाय ‘लेखन आणि प्रकाशन’ व्यवसाय तोट्यात आहे. त्यामुळे सध्याचा पुस्तक प्रकाशनावरील १८ टक्के जीएसटी कमी करण्यासाठी मी आणि आमचे सहकारी पाठपुरावा करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
१००वे संमेलन पुण्यात
राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये आणि महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असावी, याचा पुनरुच्चार करत शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात, तर विश्व साहित्य संमेलन दुबईला होईल, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली.
Web Summary : DCM Eknath Shinde announced 50% discounted book stalls in Maharashtra bus stands and municipalities. He pledged support for Marathi, promising to reduce the 18% GST on books. The 100th Marathi Sahitya Sammelan will be in Pune.
Web Summary : डीसीएम एकनाथ शिंदे ने महाराष्ट्र के बस अड्डों और नगर पालिकाओं में 50% रियायती किताबों की दुकानों की घोषणा की। उन्होंने मराठी के लिए समर्थन का वादा किया और पुस्तकों पर 18% जीएसटी कम करने का आश्वासन दिया। 100वां मराठी साहित्य सम्मेलन पुणे में होगा।