शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, आत्महत्या केल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:38 IST

पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची शक्यता

मुराद पटेलशिरवळ : पणन महासंचालक, पुणे सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ५०, रा. गोखलेनगर, पुणे) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका हाँटेलसमोरुन ते बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकांत घोरपडे हे आपले मिञ प्रदिप मोहिते यांच्या कारमधून (एमएच-११-सीडब्ल्यू-४२४४) पुणे कार्यालयातून गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असत. माञ उशिरपर्यंत ते घरी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली.दरम्यान मिञ प्रदिप मोहिते यांच्या मोबाईलवर खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावरुन कार गेल्याचे फास्टटँगचा मॅसेज आल्याने ते साताऱ्याकडे गेल्याचे समजल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर संबंधित कार लावल्याचे तेथे चहा पिल्याचे निदर्शनास आले. यावेळी शोधाशोध केली असता शशिकांत घोरपडे यांचा ठावठिकाणा मिळू न शकल्याने श्रीकांत घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.याचदरम्यान, नीरा नदीच्या पात्रालगत सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. याबाबत स्पष्टता होत नाही. घटनास्थळी बेपत्ता  अधिकाऱ्याचे नातेवाईक यासह पोलीस दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे भोईराज जलआपत्ती यांच्यामार्फत नीरा नदीपाञात शोधकार्य सुरु आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी