शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:36 IST

स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

दिलीप पाडळेपाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रोबेरीच्या चालू वर्षाच्या हंगामाकरिता प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग काही अंशी सुरू झाली. मात्र यावर्षी कमी पर्जन्यमनामुळे रोपे तयार होण्यास अवधी लागत असल्याने संपूर्ण तालुक्यात पूर्ण लागवड होण्यास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पहिल्या लागवडीच्या स्ट्रॉबेरीची लज्जतदार  गोड आंबट चव प्रत्यक्ष पर्यटकांना दीपावली दरम्यान नोव्हेंबरमध्ये चाखता येणार आहे.महाबळेश्वर तालुका स्ट्रोबेरी हब म्हणून ओळखला जातो. स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. येथील वातावरण मुख्यतः स्ट्रॉबेरीपिकासाठी पोषक आहे. स्टोब्रेरीची लागवड करण्याकरिता लागणारी मुख्य रोपे परदेशातून आयात केली जातात. त्याची पुनर्लागवड करून त्यामधून लागणीसाठी हवी असलेली रोपांची निर्मिती करून पुन्हा नव्याने रोप निर्मित केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष सुप्टेंबर महिन्यात स्ट्रोब्रेरीच्या रोपांची लागवड केली जाऊन, दीड महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू होते, ते मार्च ते एप्रिल पर्यंत उत्पन्न घेतले जाते.स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कार्बोहायड्रेटस जीवनसत्त्व ‘क’, ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. 

तालुक्यात पूर्ण क्षमतेने स्ट्रॉबेरी लागवड होण्यास अजून दहा ते बारा दिवसांचा अवधी आहे. या वर्षी पर्जन्यमान कमी असल्याने रोपे तयार होण्यास वेळ लागत आहे. त्याचा परिणाम उशिरा लागवड होण्यास झाला आहे. - किसन शेठ भिलारे अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संस्था  

स्ट्रॉबेरी हे आमच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र आहे. नुकतीच पाच हजार विंन्टर जातीच्या रोपांची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीचा प्रथम भार दीड महिन्यात येऊन दीपावली दरम्यान चांगला दर मिळण्याची अपेक्षा असते. या करीता लगबग चालू आहे.  - योगेश बावळेकर, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी. पाचगणी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान