शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

स्वच्छतेची डिजिटल यंत्रणा चोवीस तास आॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:55 IST

शहरातील जुन्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पालिकेच्या स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी डिजिटल फिडबॅक मशीन बसविण्यात आली.

ठळक मुद्दे कऱ्हाड पालिका : शौचालयातील परिस्थितीबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया अजूनही सुरूच

संतोष गुरव ।कऱ्हाड: शहरातील जुन्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पालिकेच्या स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी डिजिटल फिडबॅक मशीन बसविण्यात आली. ती आजही सुस्थितीत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल लागला. तरी आजही नागरिकांच्या सोयीसाठी ही फिडबॅक डिजिटल यंत्रे चोवीस तास आॅन आहेत.

कऱ्हाड शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील घरगुती लोकांना स्वत:चे शौचालये पालिकेने बांधून दिली आहे. तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील चाळीस ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. तसेच अजून काही ठिकाणी नव्याने शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. अशा शौचालयाच्या ठिकाणी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात डिजिटल मशीन बसविली. या मशीनवर ‘क्या यह शौचालय स्वच्छ है? असे लिहले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी हिरवा, पिवळा व लाल या रंगाची बटणं आहेत.

हिरवा रंग स्वच्छ, पिवळा ठिक आणि लाल हा अस्वच्छ असे तीन संदेश देण्यात आले आहेत. शौचालयाबाबत काय वाटते? याबाबत नागरिकांनी या तीन बटणांपैकी कोणतेही एक बटण दाबून आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेवेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही नोंदविल्या. त्याचा परिपाक म्हणून पालिकेने या स्पर्धेत यश मिळविले. आता स्पर्धा झाली निकालही लागले. स्वच्छ सर्व्हेक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून पालिकेने बसविलेले डिजिटल यंत्रे आजही सुस्थितीत आहेत.

कऱ्हाड पालिकेत आरोग्य विभागात शंभरच्या आसपास सफाई कर्मचारी आहेत. त्यातील काहींना शौचालयाचे क्लिनिंग, बाहेरील बाजूची नियमित स्वच्छता, ट्रॅक्टर तसेच घंटागाडीद्वारे शहरातील ओला व सुका कचरा गोळा करणे तर महिला कर्मचाऱ्यांना रस्त्यांवरील कचरा गोळा करून त्याची स्वच्छता करणे आदी कामे देण्यात आली आहेत. या सफाई कर्मचाºयांकडून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसुन येत आहे.स्वच्छतेबाबत कऱ्हाड  पालिकेचे लक्षशहरातील भाजी मंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, एसटी स्टँड परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी पालिकेकडून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.आकर्षक संदेश लक्षवेधीपालिकेच्या वतीने विविध रंग वापरून शिवाय आकर्षक संदेश टाकून शहरातील रस्त्याकडेला व दर्शनी भागात असलेल्या इमारतींच्या भिंती रंगविल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश चांगल्यारितीने पोहोचत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर