शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:56 IST

कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता!

खंडाळा : ‘धोम-बलकवडी कालवा खंडाळा तालुक्यातून वाहत असून, अजनुज ते असवलीदरम्यान असणाऱ्या खिंडीत धोम-बलकवडी कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी धोम-बलकवडी कालवा जीवनदायी ठरला आहे. सध्या या कालव्याद्वारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील विविध ठिकाणची छोटे-मोठे तलाव, बंधारे भरणे शक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांत खंडाळा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. धरणाचे पाणी कालव्यालाही असल्याने हा कालवा भरून वाहत आहे. अजनुज ते असवलीदरम्यान असलेल्या खिंडीतील गेट क्रमांक अकरा जवळील भागात कालवा फुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले आहे. कालव्याला अस्तरीकरण असताना भगदाड पडले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी या भागातील माळरानातून शिवारात पोहोचले. अनेक ठिकाणी हे पाणी चालू पिकांमध्ये घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कालव्याचे भगदाड तातडीने बंद करून पाण्याचा विसर्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी