शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, एक जण ठार तर दोन जण किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 19:25 IST

उलटी व मळमळ झाल्यामुळे चालकाने कार रस्त्यालगत थांबलली, यावेळी टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली.

शिरवळ- कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गालगत बाजूला घेतली. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने एक जणाचा मृत्यू तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

यामध्ये प्रशांत भास्करराव क-हाळे (वय 47,रा.रावेत ता.हवेली जि.पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दि.2 आँक्टोंबर रोजी पहाटे 3.20 च्या दरम्यान घडली. याबाबतची घटनास्थळावरुन व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आकुर्डी,पुणे येथील डि.वाय.पाटील एमबीए महाविदयालय याठिकाणी विविध पदांवर कार्यरत असलेले अरुण बाबू पाटील, संदिप नारायण पाटील,प्रशांत भास्करराव क-हाळे,सोमनाथ मारुती हडलगेकर,विशाल तानाजी माने हे मिञ कोल्हापूर याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते.

यावेळी कोल्हापूर येथे देवीचे व जोतिबाचे दर्शन घेऊन पुणे बाजूकडे कार (क्रं- एमएच-14-केबी-0591)मधून परतत असताना कारचालक अरुण पाटील यांना अचानकपणे उचकी व शिंका येत उलटी होऊ लागल्याने शिरवळ ता.खंडाळा येथील पंढरपूर फाटा येथील महामार्गालगत कार थांबवत खाली उतरले. यावेळी कारमध्ये पाठिमागे बसलेले प्रशांत क-हाळे हे कारचालकाच्या दरवाज्याजवळ येऊन थांबले असताना सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पो (क्रं-एमएच-04-एचवाय-3873)ने कारला पाठिमागून जोरदार धडक दिल्याने महामार्गालगत असणा-या नाल्यामध्ये जात कारजवळील प्रशांत क-हाळे हे गंभीर जखमी झाले तर सोमनाथ हडलगेकर व विशाल माने हे किरकोळ जखमी झाले आहे.

गंभीर जखमी झालेल्या प्रशांत क-हाळे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.यावेळी प्रशांत क-हाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.यावेळी कारचे व टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यावेळी अरुण पाटील यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन टेम्पोचालक बंदेनवाज गुलाब शेख (रा.भिवंडी,ठाणे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार,पोलीस अंमलदार संजय सकपाळ,शिवराज जाधव हे करीत आहे. छायाचिञ- शिरवळ येथे अपघातामध्ये चक्काचूर झालेली कार..!(छाया-मुराद पटेल,शिरवळ)

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर